इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीला अवघे दोन बाकी असतांना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भाजपला पाठींबा जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे. कालच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज त्यांनी पाठींबा दिल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
१३ मे रोजी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात मतदान आहे. त्यावेळेस हा पाठींबा सुरेशदादा जैन यांनी जाहीर केल्यामुळे ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की, माझ्यावर प्रेम करणा-यांनी सर्वांना भाजपला मतदान करावे. यावेळी त्यांनी माझ्यावर कोणीही दबाव आणला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. चांगले काम करणार त्याला पाठींबा देईल असे त्यांनी सांगितले. मोदी चांगले काम करत आहे म्हणून मी समर्थन करत असून त्यांच्या उमेदवाराला पाठींबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप व शिवसेना ठाकरे गटात चुरशीची लढत आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारात चुरस आहे. या पाठींब्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर दबाव असल्याचे सांगत ते मनाने आमच्या बरोबर असल्याचे सांगितले आहे.