नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- म्हसरूळ परिसरात इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदिप मोहन गंगराडे (रा.कृष्णा व्हॅली रेसि.म्हसरूळ) असे मृत इसमाचे नाव आहे. गंगराडे गुरूवारी (दि.१०) रात्री आपल्या राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळले होते. याबाबत म्हसरूळ पोलीसांनी धाव घेतली असता ते मृत अवस्थेत मिळून आले.
याबाबत अंमलदार गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार भोज करीत आहेत.