इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिल्यानंतर काल ते तिहार जेलमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला केला. आज पक्ष कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिले भाषणात त्यांनी मोदी यांची हुकूमशाही, भ्रष्टाचार यावर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार असल्याचे भाकित केले. केजरीवाल यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी मोदी पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होतील. लालकृष्ण अडवाणींप्रमाणे भाजप त्यांना निवृत्त करणार का? असा सवाल करून केजरीवाल म्हणाले, की भाजप निवडणूक जिंकल्यास अमित शाह यांना मोदी पंतप्रधान करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत पदावरून हटवले जाईल.
यासाठी राजीनामा दिला नाही
यावेळी त्यांनी हेमंत सोरेन यांनी राजीनामा द्यायला नको होता, त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले की, जिथे-जिथे हे निवडणूक हरतील, तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहे.