बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खासदार उदयनराजे भोसले नेहमी चर्चत असतात. कडा, अष्टीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतही त्यांच्या एका विधानाची चर्चा आहे. यावेळी ते म्हणाले की ,पंकजाला खासदार करा नाही, तर तिला साताऱ्यात घेऊन जातो. मी राजीनामा देऊन तिला निवडून आणतो हेच त्यांचे विधान लक्षवेधी ठरले.
या सभेतच उदयनराजे म्हणाले, की आजची सभा प्रचार सभा नाही, तर विजयी सभा आहे. आमचे वडील गेले तेव्हा माझे बोट धरायला कोणी नव्हते; मात्र गोपीनाथ मुंडे यांनी माझे बोट धरले. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन विचारतो, पंकजाला निवडून देणार ना? असा प्रश्न त्यांनी विचारताच उपस्थितीतांनी एकाच आवाजात हो असे उत्तर दिले. उदयनराजे यांच्या भाषणाच्या वेळी पंकजा यांनाही अश्रू अनावर झाले.
कॉलर व टाळ्यांचा कडकडाट
उदयनराजेंनी हेलिकॉप्टरनमधून परळीत एन्ट्री केली. त्यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाषणासाठी येताच त्यांना कॉलर उडवण्याचा आग्रह धरला. त्यांनी कॉलर उडवली आणि सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.