पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यामुळे आज दिवसभर त्याचीच चर्चा होती. आजपर्यंत अजित पवारांवर टीका करणारे राज ठाकरे यांनी हे कौतुक केले. ते म्हणाले की, अजित पवार या माणसाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, माझे त्यांच्याशी मतभेद असतील; पण मी त्यांना जेवढे ओळखतो, ते पाहता त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. शरद पवार यांच्यासोबत राहूनही जातीपातीच्या राजकारणापासून ते दूर राहिले.
एकीकडे अजित पवार यांचे कौतुक करतांना दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांना जातीपातीच्या राजकारणावरून लक्ष्य केले. या सभेत त्यांनी
मौलवी आणि मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे निघत असतील, तर मी ही हिंदूंना फतवा काढतो आणि भाजपला मतदान करण्यास सांगतो असे सांगत त्यांनी जोरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले आज काय तर म्हणे, मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये, मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे निघत आहेत; मात्र या देशात अनेक मुसलमान आहेत, ज्यांना अक्कल आहे. ते यांच्या वाटेला जाणार नाहीत. त्या मुसलमानान राजकारण कुठं चालले हे चांगलेच समजते.