नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर त्यांची तिहार तुरुंगातून सुटका केली. आज त्यांनी थेट भाजपवर हल्ला केला. ते म्हणाले की, तुम्हा सर्वांमध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. आपल्याला मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे, मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन, मला देशातील १४० कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.