नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांची इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी खास मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक विषयी गप्पा मारल्या. निवडणुकीत मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद, प्रचारासाठी अवघे आठ दिवस बाकी असतांना सभा व प्रचाराचे केलेले नियोजन या विषयावरही त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर अचानक उमेदवार म्हणून आलेले नाव व त्यात घडलेल्या राजकीय घडामोडी यावरही त्यांनी भाष्य केले.
या मुलाखतीत नाशिक लोकसभा निवडणुकीत भुजबळ यावेळेस उमेदवार नाही. पण, मराठा समाजाचे प्रमुख उमेदवार स्पर्धेत आहेत. त्याचबरोबर दोन महंत आहे. त्यातच ही निवडणूक शिवसेना विरुध्द शिवसेना अशी असल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल यावरही त्यांनी सविस्तर उत्तर दिले. त्याचबरोबरच राज्यातील राजकीय स्थितीबद्दलही त्यांनी सांगितली. तर बघूया ही खास मुलाखत…..