इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ईशान्येकडील राज्यांमध्ये पर्यटनाच्या विकासासाठीच्या कृती दलाची पाचवी बैठक आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ईशान्येकडील राज्यांमधील पर्यटनाच्या विकासासाठी क्षमता बांधणी, प्रशिक्षण धोरणे, विपणन आणि प्रोत्साहन यासाठीच्या धोरणांवर चर्चा झाली.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील आठ राज्यांतील अधिकारी, तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्यासह विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) तसेच इतर खाजगी भागीदार, या बैठकीला उपस्थित होते.