इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरात आज झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडले. तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडून वीज तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी वाहिनीवर दुरुस्तीचे काम सुरु केले. कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे कर्मचारी यांचे मदतीने उन्मळून पडलेले झाडे आणि फांद्या बाजूला करून पोल नव्याने उभे करण्यात येत आहे. काही भागात विदयुत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे तर अनेक भागातील वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत केला आहे.