नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आभोना परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा व झालेल्या पावसाने कांदा व्यापाऱ्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे व्यापाऱ्यांनी शेड मध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजून गेल्याने कांदा खराब झाला आहे. यात ५ ते ६ कांदा शेडचे नुकसान झाल्याने कांदा व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.