नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भुषण दिनकर लहामगे असे मृत तरुणाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू आहे. नाशिकहून वाडीव-हेकडे मोटर सायकलले जात असतांना भूषण लहामगेवर मागून कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आली.
या युवकाची हत्या करून मारेकरी फरार झाले आहेत. वाडीव-हे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.









