नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील नारखेडे स्विच गेअर या कंपनीत चोरी करणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र रंका पंडा ४८ रा.सिंहस्थनगर,सिडको),जयप्रकाश अमरप्रकाश जावळे (४९ रा.शालिनीताई बोरसे शाळेजवळ,उपेंद्रनगर सिडको) व विनोद रमेश अवचारे (४० रा.लेण्याद्री दर्शन अपा.वासननगर,पाथर्डी फाटा ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणेश मुरलीधर भोळे (रा.जाधव संकुल चुचाळे शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. औद्योगीक वसाहतीतील नारखेड स्विच गेअर कंपनीत सोमवारी (दि.६) रात्री ही चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी बंद कंपनीत शिरून इलेक्ट्रीक पॅनलला लागणारे कॉपर बेसबार व जॉब पार्ट असा सुमारे १५ हजार ९१० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
ही घटना उघडकीस येताच पोलीसांनी तीघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.