इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे ते आता लोकसभा निवडणुकीत प्रचार करु शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी संमती दिली आहे. २ जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावे लागणार आहे. दारु घोटाळा प्रकरणी त्यांना २१ मार्चला केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. अगोदर ईडी कस्टडीत ठेवण्यात आले. त्यानंतर १ एप्रिलपासून ते तिहार तुरुंगात बंद होते.
दिल्लीत सहा जागेवर २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्याअगोदर त्यांची सुटका झाल्यामुळे आम आदमी पार्टीबरोबरच इंडिया आघाडीला बळ मिळणार आहे.आज सर्वोच्च न्यायलयाचे जस्टीस संजीव खन्ना, जस्टीस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला.
तुरुंगातून सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचाराला सहभागी होऊ शकतात. पत्रकार परिषद घेऊ शकतात. त्यामुळे आता ते काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.