नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एचएएल, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स बंगळुरू येथील एमआरओ विभागात माजी सैनिकांसाठी विमान तंत्रज्ञ (स्केल डी-6 ) या पदासाठी चार वर्षे कालावधीच्या आधारावर गैर कार्यकारी संवर्गात विविध पदावर पदभरती होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सैनिकांनी 17 मे 2024 पर्यंत पदभरतीसाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल ओंकार कापले (निवृत्त) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
विमान तंत्रज्ञ (स्केल डी-6 ) अंतर्गत ट्रेड एअर फ्रेम (पोस्ट कोड ACTM-2401) या पदासाठी 12 जागा असून शैक्षणिक पात्रता मॅकेनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा अथवा समतुल्य अशी आहे. ट्रेड इलेक्ट्रिकल (पोस्ट कोड ACTE-2401) या पदासाठी 11 जागा असून शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा अथवा समतुल्य अशी आहे. या दोन्ही पदांसाठी वेतनश्रेणी स्केल डी-6 (in Rs pm) अशी आहे. मूळ वेतन रूपये 23 हजार व इतर भत्ते रूपये 34 हजार असे एकूण अंदाजे वेतन रूपये 57 हजार इतके असणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी 0253-2970755 यावर संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.