इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमच्या सोबत या, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, अशी खुली ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना नंदुरबारच्या सभेत दिली. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही, ज्यांची विचारधारा संसदीय लोकशाही मानत नाही. त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी मात्र मोदी यांच्यासोबतचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहतील असेही स्पष्ट केले.
तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता भाजपसोबत जात नसल्याचं दिसताच पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांना सोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर म्हणजे भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच आहे…