नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
खरं तर ही सदिच्छा भेट असली या भेटीमुळे मात्र राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शांतीगिरी महाराज हे लोकसभेसाठी महायुतीकडून इच्छुक होते. पण, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला व जोरदार प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या प्रचारामुळे अगोदरच राजकीय पक्षांना धडकी भरलेली असतांना त्यांची ही भेट चर्चेची ठरली आहे.