नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट झाली. या भेटीत त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारात त्यांनी आतापर्यंत सक्रीय सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे ही भेट महत्त्वाची समजली जाते.
या भेटीच्या वेळी उपनेते अजय बोरस्ते, जिल्हा संपर्कप्रमुख विजय करंजकर यांच्या शिवसेनेचे नेते उपस्थितीत होते. या भेटीत निवडणुकीविषयी चर्चा झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी गोडसे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप, ऱाष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट एकत्र असल्यामुळे गोडसे यांचा प्रचार करण्याची वेळ कोकाटेंवर आली. पण, त्यांनी अद्यापर्यंत सहभाग घेतला नसल्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते.
सिन्नर लोकसभा मतदार संघात यावेळेस कोकाटे यांच्या विरोधात विधानसभा निवडूक लढवणारे राजाभाऊ वाजे हे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहे. स्थानिक उमेदवार असल्यामुळे वाजे यांना या मतदार संघात जास्त मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोकाटे यांची मनधरणी करुन सिन्नर मधूनही जास्तीचे मते महायुतीला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व आहे.