इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली येथे मेसर्स श्री राज महल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड (SRMJPL), मेसर्स गिन्नी गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (GGPL), अशोक गोयल, प्रदीप गोल यांच्या मालकीच्या दिल्ली आणि NCR मधील ११ ठिकाणी शोध मोहिम हाती घेतली आहे.
या कारवाईत प्रवीण कुमार गुप्ता [प्रवर्तक/संचालक] आणि त्यांच्याशी संबंधित अनेक शेल कंपन्या बाबत केलेल्या शोध मोहिमेदरम्यान, रोख रक्कम २० लाख ५० हजार, ५ हाय एंड लक्झरी कार्स [मर्सिडीज/बीएमडब्ल्यू] ज्याचे मूल्य अंदाजे दोन कोटी रुपये आहे. प्रवर्तकांनी डमी संस्था/व्यक्तींच्या नावावर १ कोटी किमतीची एफडी, प्रवर्तकांनी अनेक शेल कंपन्यांद्वारे ठेवलेल्या मालमत्ता, बँक खात्यांशी संबंधित विविध पुरावे जप्त करण्यात आले.