नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी नाशिक दिवाणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले हे ५०० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा न्यायालयात दाखल करायचा होता. सदरचा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो.सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण लोकसेवक यांचेकडे जमा करावे लागते. परंतु सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापुर्वी लोकसेवक यांचेकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात. त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापुर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी लोकसेवक यांचेकडे घेवून गेले असता कोर्ट फी स्टॅम्प ची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 08/05/2024 रोजी 500/- लाचेची मागणी करून आज दिनांक 09/05/2024 रोजी सदर 500/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध सरकार वाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरूष वय- 34 वर्ष
आलोसे- मनोज दत्तात्रय मंडाले पद- सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, नाशिक.
*लाचेची मागणी- 500/-
*लाच स्विकारली- 500/-
*हस्तगत रक्कम- 500/-
*लाचेची मागणी – दि.07/05/2024
*लाच स्विकारली – दि.08/05/2024
तक्रार:- यातील तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा माननीय न्यायालयात दाखल करायचा होता सदरचा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो .सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण लोकसेवक यांचेकडे जमा करावे लागते. परंतु सदर ची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापुर्वी लोकसेवक यांचेकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात. त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापुर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी लोकसेवक यांचेकडे घेवून गेले असता कोर्ट फी स्टॅम्प ची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 08/05/2024 रोजी 500/- लाचेची मागणी करून आज दिनांक 09/05/2024 रोजी सदर 500/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध सरकार वाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक.
*सापळा व तपास अधिकारी – श्रीमती मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 9921252549
*सापळा पथक – पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके.