इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कंपनी चालू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे या दीड लाखाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. या लाच प्रकरणात आळे यांनी तेजस मदन गर्गे, डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारले बाबत सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता सदर लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली म्हणून त्यांचेवर इंदिरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभाग ,नाशिक यांचे ना हरकत प्रमाणपत्र लागत असल्याने ते मिळणेकामी त्यांनी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी दिनांक ६ मे रोजी दीड लाखाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक ७ मे रोजी. पंचासमक्ष सदर लाचेची रक्कम दीड लाख स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर आरती मृणाल आळे यांनी तेजस मदन गर्गे, डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारले बाबत सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता सदर लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली म्हणून त्यांचेवर इंदिरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार-पुरुष, 32 वर्ष, नाशिक, जिल्हा – नाशिक
आलोसे –
1)आरती मृणाल आळे , वय – 41 वर्ष,
रा. फ्लॅट नंबर 17, ए विंग,अनमोल नयनतारा, रानेनगर, नाशिक
2) तेजस मदन गर्गे डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलणालय विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई रा.इमारत क्र.6फ्लॅट न.20,लाला कॉलेज जवळ, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ,मुंबई
*लाचेची मागणी- दिनांक 06/05/2024 रोजी 1,50,000/- रुपये
*लाच स्विकारली – दिनांक 07/05/2024 रोजी1,50,000/- रुपये
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांना कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभाग ,नाशिक यांचे ना हरकत प्रमाणपत्र लागत असल्याने ते मिळणेकामी त्यांनी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी दिनांक 06-05-2024 रोजी 1,50,000/- लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक 07-05-2024 रोजी. पंचासमक्ष सदर लाचेची रक्कम 1,50,000/-स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर आलोसे आरती मृणाल आळे यांनी तेजस मदन गर्गे, डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारले बाबत सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता सदर लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली म्हणून त्यांचेवर इंदिरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाम सुरू आहे.
आलोसे क्र.1-यांचे सक्षम प्रधिकारी- संचालक, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
*आलोसे क्र.2 -यांचे सक्षम प्राधिकारी मा. प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सापळा अधिकारी – श्री. एन. बी.सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा सह अधिकारी- श्रीमती सुवर्णा हांडोरे , पोलिस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक– पोलीस हवालदार/ सचिन गोसावी, पोलीस नाईक/ अविनाश पवार सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .