इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सीबीआय न्यायालयाने केंद्रीय उत्पादन शुल्क आणि केंद्रीय कर अधीक्षकांना लाचखोरीच्या प्रकरणात पाच लाखांच्या दंडासह तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सीबीआय प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश, बंगळुरू यांनी जितेंद्र कुमार डागूर, तत्कालीन केंद्रीय उत्पादन शुल्क आणि केंद्रीय कर (जीएसटी) यांना ही शिक्षा सुनावली. सीबीआयने २६ मार्च २०२१ रोजी जितेंद्र के डागूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आर्थिक वर्षातील कर आणि दंड माफ करण्यासाठी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची मागणी केली आणि स्वीकारल्याचा आरोप आहे.
त्यानंतर सीबीआयने सापळा रचून आरोपीला १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर या खटल्यात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्यानुसार शिक्षा सुनावली.