नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– माजी सैनिकास बोलण्यात गुंतवुन भामट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून रोकड असलेली बॅक चोरून नेली. या बॅगेत सुमारे ४९ हजाराची रोकडसह महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान हिंदूराव पाटील (रा.करंजकरनगर,दसक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील मंगळवारी (दि.८) बँकेतून रोकड काढून ड्रायफुड घेण्यासाठी सुभाषरोड भागात गेले असता ही घटना घडली. रिपोटे कॉर्नर भागातील सागर ड्राय फुड दुकानासमोर ते आपली अॅक्टीव्हा पार्क करीत असतांना ही घटना घडली. अनोळखी व्यक्तीने गाठून त्यांना बोलण्यात गुंतविले. यावेळी त्याने पैसे खाली पडले असल्याची बतावणी केल्याने पाटील पडताळणी करीत असतांना भामट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत रोकडसह कागदपत्र होती. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
३२ वर्षीय व्यक्तीने लॉजिंगमध्ये केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबरनाथ येथील ३२ वर्षीय व्यक्तीने लॉजिंगमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खुशाल यशवंत शिंगाडे (रा.वागणी अंबरनाथ जि.ठाणे) असे मृत प्रवाश्याचे नाव आहे. शिंगाडे सोमवारी (दि.६) शहरात आला होता. नाशिकरोड येथील हॉटेल साई लॉजिंग मधील रूम नं. १०३ मध्ये तो मुक्कामी थांबला होता. दुस-या दिवशी दुपारपर्यंत तो आपल्या रूम बाहेर न पडल्याने लॉज कर्मचाºयांनी पाहणी केली असता त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत पंकज सोनवणे (रा.निमगाव गोळे जि.अ.नगर) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.