शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही परिक्षा या तारखेला…५२४ पदांचा सुधारित सविस्तर तपशील या ठिकाणी बघा

मे 8, 2024 | 10:10 pm
in संमिश्र वार्ता
0
mpsc11

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या
(एक) *राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431
(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे),(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे),(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे), (11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)
(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(तीन )
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)
(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे),(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).

शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील “ माय अकाऊॅट” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या “क्वेशन ” या बटनावर क्लिळ करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्‌धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

        सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

        संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही

        महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 25 जानेवारी, 2024  अशी राहील.

        महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

        या परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

         प्रस्तुत परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील एकूण 16 संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले. आता सदर शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धीपत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण 22 संवर्गासाठी पात्रता (वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, दिव्यांग सुनिश्चिती इत्यादी बाबी )  मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल.

         उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने  उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक 3468/2024 तसेच इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024  च्या मूळ जाहिरातीस व सदर शुद्धिपत्रकास आयोगाच्या दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी लागू राहतील .

        दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी, 2024 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने कळविले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींच्या हातात अनपेक्षित रक्कम हाती येईल, जाणून घ्या, गुरुवार, ९ मेचे राशिभविष्य

Next Post

अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई; २३ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
daru 1

अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई; २३ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011