नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात नुकत्याच झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यानी सुमारे साडे सहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली. आशालता महेंद्र देवळीकर (रा.रूद्राक्ष बंगला,अश्विननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवळीकर कुटूंबिय २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास बंगल्याच्या दुसºया मजल्यावर असतांना अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा ग्रीलमध्ये हात घालून दरवाजाची कडी उघडली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूमधील कपाटात ठेवेलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.
दुस-या घटनेत मखमलाबाद येथील मानकर मळा भागात राहणा-या पारस संतोष देशमुख (रा.दृश्री शिवम रो हाऊस कारभारी शिंदे नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख कुटूंबिय रविवारी (दि.५) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली ८० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख १४ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.