नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या २० मेला नाशिक मध्ये मतदान होणार आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे उमेदवार आहेत, सर्वजण ताकतीने काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, कमी चेंडूत जास्त रन काढण्याची आम्हाला सवय आहे. हेमंत गोडसे यांची ओळख करून देण्याची गरज नाही. ते दोन टर्म खासदर राहिले आहेत. सगळ्यांचे मनोमिलन झाले आहे.
यावेळी त्यांनी विजय करंजकर यांचा प्रवेश आतापर्यंतचा मोठा पक्ष प्रवेश असल्याचेही सांगितले. माझा आवाज जरा बसलाय, रोज खूप भाषणं करावी लागतायत. हेमंत गोडसे यांच्या जोडीला आता विजय आप्पा आलेत त्यामुळे गोडसे यांचा विजय निश्चित आहे. विजय करंजकर जसं शेवटपर्यंत तुमचं नाव होतं, तसच शेवटपर्यंत माझंही नाव होतं. मी नाही तर दुसऱ्या कुणाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवायचं होतं. मात्र स्वतःचं टपकन उडी मारून बसले मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी शांतिगिरी महाराज यांच्याशी देखील मी बोललो होता. राजकीय पेक्षा अध्यात्मिक क्षेत्रात तुमचे कार्य असले पाहिजे. राजकीय लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. ते त्यांच्या लोकांशी बोलून निर्णय घेणार, असं म्हणाले मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी नगरबाबत याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव राहणार आहे. अडीच वर्षे सरकारचे काम बंद होते, मात्र आमच सरकार आल्यापासून जोरात काम सुरू आहे. हे सरकार मजबूत आहे, पहिले सरकार पडेल असे सांगण्यात येत होते. त्यांच्याकडे फ़क्त शिव्या शाप आहेत, आमच्याकडे विकास काम आहे. अनेक जण पक्षात येत असल्याने महायुतीची ताकत वाढत आहे.
यावेळी त्यांनी कांदा प्रश्न सुटलाय, लवकरच निर्यात सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.