इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज भुजबळ फॉर्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. यावेळी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी मिळण्यापूर्वी भुजबळ व गोडसे यांची काळाराम मंदिरात भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी आशीवार्द घेतले होते. त्यानंतर आज गोडसे यांनी थेट भुजबळ फॅार्म गाठत भेट घेतली. गेल्या तीन निवडणुका भुजबळ व गोडसे यांनी एकमेकांविरोधात लढवल्या आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. महायुतीमध्ये आता या दोन्ही नेत्यांचे पक्ष एकत्र असल्यामुळे गोडसे यांच्या प्रचारासाठी भुजबळ पहिल्यांदा दिसणार आहे.