इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावमधील रामगदेववाडीजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला आहे. हे तीनही जण एकाच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी आहे. या अपघातानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७) असे मयत आई व मुलांचे नाव आहे. राणी चव्हाण या कामानिमित्त दुचाकीवरुन जळगावला जात असतांना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात हे तीन जण ठार झाले.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. संतप्त जमावाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेनंतर दुचाकी पूर्ण चक्काचूर झाला आहे.