पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएमसमोर आरती केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी ईव्हीएम समोर आरती केली. चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्र पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय होत्या. आज या मतदार संघात मतदान असतांना त्यांनी ही आरती केली व ती त्यांच्या अंगलट आली. मतदान केंद्रावरील अधिका-यांनी त्यांना रोखत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. सिंहगड पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली.