इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीच्या निवडणुकीसाठी मविआ तील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आप आणि सपा या घटक पक्षांसह पाठींबा दिलेल्या वंचितचे मनापासून आभार मानत आमदार रोहित पवार यांनी आपल्या एकजुटीमुळं ४ जून रोजीचा गुलाल आपलाच असेल असे सांगितले.
दिवसभर धमकी, दडपशाही, अमिषं आणि सत्तेच्या बळावर सुरू असलेला पैशांचा खेळ या सगळ्या गोष्टींच्या नाकावर टिच्चून मतदान केलेल्या सर्व स्वाभिमानी मतदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. लोकशाहीच्या उत्सवात मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दिवसभर ज्याप्रकारे मेहनत घेतली त्याचा मनापासून अभिमान वाटतो!
तुमच्या मेहनतीचं फळ ४ जून रोजी मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.