नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकारी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्त्याची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात ५४ हजार रुपयाची लाच घेतांना धुळे जिल्हयातील पिंपळनेर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधिनस्त पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत. बाल विकास प्रकल्प अधिकारी या कार्यालयाच्या प्रभारी अधिकारी असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरणाचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आहेत. तक्रारदार व त्यांच्या कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्त्याची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात अदा रकमेच्या १० टक्के लाच मागणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून करण्यात आली होती. तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यापोटी मंजूर रुपये 9,37,533/- रक्कमेच्या १० टक्के रक्कम रुपये 93,000/- अशी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी लाच म्हणून मागणी केल्याबाबत पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली होती. सदर लाच रकमेपैकी पहिला हप्ता रुपये 54,000/- स्वीकारताना आलोसे यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेची यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- महिला, 51 वर्ष.
आरोपी – *1) श्रीमती शुभांगी बनसोडे, वय 39 वर्ष, पद- बाल विकास प्रकल्प अधिकारी,(राजपत्रित गट ब) एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे.
*लाचेची मागणी- 93,000/- रुपये दिनांक 06/05/2024
लाच स्वीकारली – 54,000 /- रुपये (पहिला हप्ता) दिनांक 07/05/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार या आलोसे यांच्या अधिनस्त पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत. आलोसे हया कार्यालयाच्या प्रभारी अधिकारी असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरणाचे अधिकार आलोसे यांना आहेत. तक्रारदार व त्यांच्या कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्त्याची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात अदा रकमेच्या १० टक्के लाच मागणी आलोसे यांच्याकडून करण्यात आली होती. तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यापोटी मंजूर रुपये 9,37,533/- रक्कमेच्या १० टक्के रक्कम रुपये 93,000/- अशी आलोसे यांनी लाच म्हणून मागणी केल्याबाबत पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली होती. सदर लाच रकमेपैकी पहिला हप्ता रुपये 54,000/- स्वीकारताना आलोसे यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक– पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.शि. प्रशांत बागुल, चालक पोहवा जगदीश बडगुजर.