नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बहुला येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अशोक भावले (रा.भावले मळा.वासळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भावले कुटुंबिय रविवारी (दि.५) रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची आतील कडी तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली २५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक रोहीत गांगुर्डे करीत आहेत.