इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सकाळपासून नॉट रिचेबल झालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत मतदानाला १५ मिनिटे बाकी असतांना अवतरले. त्यानंतर त्यांनी पाली या त्यांच्या मुळगाव मतदानाचा हक्क बजावला. सीम कार्डमध्ये प्रॅाब्लेम झाल्यामुळे आपण नॅाट रिचेबल होतो. पण, ड्रायव्हर व बॅाडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो असे सांगत त्यांनी वेळ मारुन नेली.
सकाळी किरण सामंत नॅाट रिचेबल असल्यामुळे राणे यांची धाकधूक वाढली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत. राणे यांनी आज सकाळीच मतदान केल्यानंतर मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र आज सकाळपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राणे यांची धाकधूक वाढली होती.
सामंत यांचे कार्यकर्ते सकाळपासून त्यांना फोन लावत होते. परंतु सामंत यांच्याशी कुणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली होती. पण, सायंकाळी त्यांनी मतदान केल्यामुळे काहीसा दिलासा राणेंना मिळाला.