नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणातून चारित्र्याविषयी बदनामी करीत एकाने तरूणीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव प्रभाकर भवर असे संशयिताचे नाव आहे. पीडितेचे संशयिताशी प्रेमप्रकरण होते. या काळात त्याने अश्लिल फोटो काढले होते. यानंतर मुलीचा विवाह जमल्याने संशयिताने लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता संशयिताने पीडितेच्या होणा-या पतीसह तिच्या बहिणीच्या पतीच्या मोबाईलवर अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठवून चारित्र्याविषयी बदनामी केली.
तसेच पीडीतेच्या कामाच्या ठिकाणी आणि पाठलाग करीत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पिडीतेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.