नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टकलेनगर भागात सीसीटिव्ही यंत्रणेची वायर कापून चोरट्यांनी एटीएम बुथमधील बॅट-या चोरून नेल्याची घटनाघडली. या घटनेत एक्साईड कंपनीच्या २५ हजाराच्या बॅटºया चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक चंदनकुमार किशोरकुमार मिश्रा (रा.पिंपळगाव ब.) यांनी फिर्याद दिली आहे. टकलेनगर येथील काट्या मारूती मंदिराजवळील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.५) रात्री एटीएम बुथमधील सीसीटिव्ही यंत्रणेची वायरी कापून पॉवरबॅकसाठी लावण्यात आलेल्या सहा बॅटºया चोरून नेल्या. अधिक तपास पोलीस नाईक काळे करीत आहेत.