येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहराचे संस्थापक रघुजीबाबा यांनी ३५० वर्षा पुर्वी पुर्वीच्या येवलेकरवाडी म्हणजेच आजच्या येवला शहर वसवले, याच वेळी त्यांनी ठिकठिकाणाहून कारागिर आणून शहरात त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला. अशा या रघुजीबाबा यांची दरवर्षी मोठ्या उत्सवात येवलेकर नागरीक त्यांचा यात्रोत्सव साजरा करत असतात,
आज त्यांच्या गढीतून त्यांच्या मुखवट्याची पालखी काढण्यात येऊन गंगेतून आणलेल्या पाण्याची कावड यात्रा काढण्यात आली, तर शहरातील त्यांच्या मंदीरात पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. तीन दिवस चालणा-या यात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.