बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे हे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते.
पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!