नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ व डॉ.सुभाष भामरे यांच्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
धुळे लोकसभा मतदार संघातालील बागलाण, मालेगाव मध्य व बाह्य हे तीन विधानसभा मतदार संघ हे नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची समजली जाते. या मतदार संघात भुजबळांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असल्यामुळे भुजबळांची भेट डॅा. भामरे यांनी घेतली. या मतदार संघात ओबीसी मतदारांचे प्राबल्य सुध्दा मोठे आहे. त्यामुळे भुजबळांची मदत मिळेल हे सुध्दा या भेटीमागील कारण आहे.
गेल्या काही दिवसात भुजबळांच्या भेटीला भाजपचे प्रदेशाध्यत्र चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, डॅा. भारती पवार यांच्यासह अनेकांनी भेटी घेतल्या. त्यानंतर आज डॅा. भामरे यांनी ही भेट घेतली.