नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुत्व वादी पक्ष म्हणवणाऱ्या पक्षांनी हिंदु साधू, महंत नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी का दिली नाही? आता समजला असेल की असली आणि नकली हिंदुत्व काय आहे ! या देशाला भौतिक, शैक्षणिक व्यावसायिक सांस्कृतिक आध्यात्मिक ,आर्थिक प्रगती करायची असेल असेल तर साधू महंत शिवाय पर्याय उरला नाही अशी पोस्ट सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकण्यात आली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमुळे भाजप व शिवसेनेची झोप उडणार आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात साधु, महंत यांनी उमेदवारी महायुतीकडे मागीतली. पण, या ठिकाणी कोणालाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे धर्मनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिकमध्ये दोन महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे. हिंदुत्वाचा प्रचार करणा-या भाजप व शिवसेनेला या महाराजांची वरवर उमेदवारी राजकीयदृष्या फारशी महत्त्वाची वाटत नसली तरी हिंदुत्वाचा अजेंठा पुढे नेतांना मात्र अडचण झाली आहे. त्यात भाजपचा अधिकृत उमेदवार उभा नसल्यामुळे ही मते महाराजांकडे वळणार तर नाहीना ही भीती महायुतीच्या उमेदवारापुढे असणार आहे. पुढील काळात महाराजांचा धाराधार प्रचार मात्र असली नकली हिंदुत्वावर होणार असल्याचे संकेत देणारी ही पोस्ट असल्यामुळे ती चर्चेत आहेत.
या पोस्टमध्ये आता बेरोजगारी, नशा, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आपल्या मताशी गद्दारी करणारा आणि गद्दारणा सामावून घेणारे, महागाई ,गरिबी, अशा समस्या आ वासून उभ्या आहे, या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी जात, पक्ष, गावाकडचा पैसे, नशा, हे सर्व बाजूला ठेऊन विवेक (समाजासाठी चांगला आणि वाईट काय याची जाण ठेऊन ) आपले महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, महंत सिद्धेश्वर महाराज हे साधे सरळ, पवित्र ब्रह्मचारी सात्विक उच्च शिक्षण घेतले असून,समाजकारण,अध्यात्मिक असून योग्य उमेदवार या लोकसभेसाठी आहे असेही म्हटले आहे.