इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो केज पोलिसांनी पकडला. या टेम्पोमधून दोन कोटी १८ लाख रुपयांच्या चंदनची चोरटी वाहतूक केली जात होती. सव्वा टन चंदन या टेम्पो होते. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात हे चंदन नगरसेवक बालाजी जाधव यांचे असल्याचे समजते. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक असल्याचे समजते. जप्त केलेले चंदन आणि टेम्पो केज पोलिसांच्या ताब्यात आहे. वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाधव हा केज नगर पंचायतमध्ये नगरसेवक आहे. तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहे.
पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळताच सापळा रचून १२५० किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे. एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केजकडून धारूरकडे जाणार होता. पहाटेच ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना या टेम्पोत ६० गोण्या चंदन आढळून आले. या चंदनाचा स्थानिक नगरसेवकाशी संबंध असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.