नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काठेगल्लीतील मानेक्षानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७७ हजाराचा ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ अनिल मराठे (रा.भरखाबहार सोसा.रविंद्र हायस्कूल जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. मराठे कुटूंबिय शनिवारी (दि.४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील लाकडी कपाटात ठेवलेली सुमारे ७० हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत.