इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता ३१ उमेदवार रिंगणात आहे. आज पाच उमेदवारांनी माघार घेतली. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात १० उमेदवार रिंगणात असून ५ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी व तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांनी निवडणुकीविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.