नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यानंतर आता ‘एनसीसीएफ’ आणि ‘नाफेड’या दोन मंडळामार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय आहे. नाशिक, पुणे, गुजरात, हरियाणा या ठिकाणी खरेदी केंद्र असतील. ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे ही माहिती दिली. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा आणि गुजरात येथूनही पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आणि निर्यातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळात ‘एनसीईएल’च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती; मात्र त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात खुली केली. कांद्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकारण पुन्हा चांगलेच तापले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केली आहे.