गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसटी वाहकासह प्रवाशास खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या चालकाने केली मारहाण

by India Darpan
मे 6, 2024 | 5:38 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका भागात एसटी वाहकासह प्रवाशास खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या चालकाने मारहाण केल्याची घटना घडली. बस थांबा नसतांना एसटी का थांबविली या कारणातून हा वाद झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकेश कैलासगिरी गोसावी (रा.नांदगाव बु.ता.मालेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गोसावी एस.टी. महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून रविवारी (दि.५) ते नाशिक मालेगाव बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. मेळा बसस्थानकातून सुटलेली बस दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील ब्रिजवर चढणा-या मार्गास लागली असता ही घटना घडली. उड्डाणपूल चढण्यापूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका प्रवाश्याने हात दाखविल्याने चालकाने बस थांबविली. यावेळी गोसावी यांनी दरवाजा उघडून प्रवाश्यास बसमध्ये घेत असतांना तेथे उभ्या असलेल्या एमएच १५ एचसी ५५१३ या खासगी प्रवासी वाहतूक करणा-या इको वाहनावरील अज्ञात चालकाने आरडाओरड करीत त्यांना शिवीगाळ केली.
एसटीचा येथे थांबा नसतांना तुम्ही येथे बस का थांबविली याबाबत जाब विचारत संशयिताने शिवीगाळ सुरू केल्याने गोसावी त्यास समजून सांगत असतांना त्याने धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवासी प्रकाश नांदकर हे वाहक गोसावी यांच्या मदतीस धावून गेले असता त्यांनाही मारहाण करीत संशयिताने शिवीगाळ केले. या हाणामारीत गोसावी यांचे कपडे फाडत संशयिताने लोखंडी वस्तू मारून फेकली मात्र गोसावी यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविल्याने अनर्थ टळला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – मुंबई- आग्रा महामार्गावर टायर फुटल्याने कार पलटी…नाशिकचे चार जण जखमी

Next Post

केंद्र सरकार खरेदी करणार इतके टन कांदा…निर्यात बंदी उठल्यानंतर निर्णय

India Darpan

Next Post
kanda 11

केंद्र सरकार खरेदी करणार इतके टन कांदा…निर्यात बंदी उठल्यानंतर निर्णय

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011