नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर आज आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यांनी उमेदवारी अर्च भरुन भाजपमध्ये बंडखोरी केली होती. पण, त्यांनी तब्येतीचे कारण देत माघार घेतली आहे.
चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदार संघातून तीन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून गेले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपला मोठी डोकेदुखी ठरली असती. पण, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात आजच माकपचे उमेदवार माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना दिलासा मिळाला. तर चव्हाणमुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. या दोन्ही माघारीनंतर आता दिंडोरी लोकसभा मतदार संघात थेट सामना हा भगरे व पवार यांच्यात होणार आहे.