नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघातून अखेर माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कालच माकपने याची घोषण केली होती. त्यांनी उमेदवारी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
माघार घेतल्यांतर गावीत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाला ही जागा सोडली होती. पण, मी माकपतर्फे उमेदवारी दाखल केली. पण, त्यानंतर राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला.
आता थेट लढत
मापकपे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात थेट लढत होणार आहे. दिंडोरी, कळवण -सुरगाणा, निफाड, येवला, चांदवड व येवला या विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या या मतदार संघात अटीतटीची लढत होणार आहे.