माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
सोमवार ६ मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवात १३ मे पर्यंत संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड अश्या १९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण तसेच खान्देश नाशिक नगर पुणे सातारा छ.सं.नगर जालना हिंगोली अश्या १७ जिल्ह्यात मात्र वरील वातावरणाची शक्यता नाही. खान्देशसहित संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार दि.७ मे पर्यन्त रात्रीचा असह्य उकाडा जाणवेल.
महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ व खान्देश तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अश्या २३ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. ९ मे पर्यन्त दुपारचे कमाल तापमान भाग बदलत ४० ते ४२ तसेच ४२ ते ४५ डिग्री से. ग्रेड. दरम्यान राहून ह्या ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवेल, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologidt (Retd)
IMD Pune.