नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर व्हिटिसी फाट्यावर रविवारी रात्री दोन मोटरसायकलच्या अपघातात पाच जण जखमी झाले. नाशिककडून येणारी मोटर सायकलला विरूध्द दिशेने येणा-या मोटर सायकलने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातात गणपत संतु मधे (२५), सागर निवृत्ती मेंगाळ (१९), सचिन देवराम का तोरे (१८), उत्तम किसन सांबरे (२२) या भरीविहिर ता इगतपुरी, वसंत दगडु पाटील (४०) रा पाथर्डी फाटा नाशिक हे जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर दोन जण गंभीर जखमींला तात्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर तीन जण वाडिव-हे येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.