नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरुन बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी शनिवारी मेळावा घेऊन लढणार व नडणार असे सांगितले होते. पण, आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त धडकले. आज रात्री ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. ते नाशिकमधून मुंबईकडे रवाना झाले आहे.
सोमवारी ६ मे ला माघारीची मुदत आहे. त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरु होत्या. बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले विजय करंजकर हे माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबत विविध अंदाज बांधले जात होते. पण, त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता ते माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी करंजकर यांनी तेरा वर्षापासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असतांना अनेकांची कामे केली. त्यानंतर त्यांनी राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे. एक जण एंन्ट्री करत तर सात जण पाय ओढतात. माझ्याकडे देखील पाच जण मागे ओढायला होते. असे सांगत त्यांनी ठाकरे सेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली होती.
विजय कंरजकर यांची उमेदवारी ठाकरे गटाला जशी मारक ठरणार होती. तशीच ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सुध्दा अडचणीची ठरणार होती. त्यामुळे शिंदे गटाने जोरदार फिल्डींग लावून त्यांना आपल्या पक्षात घेतले.