शनिवार, डिसेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

व्ही-आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून फिरता येणार मतदान केंद्रामध्ये….

मे 5, 2024 | 8:12 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240505 WA0347 e1714920095634

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी डॉ .अमोल बागुल,जिल्हा मतदारदूत यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे.

अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य व देश पातळीवर कौतुक होत आहे. मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल- मायक्रोसॉफ्ट व ॲपल टीचर डॉ.बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स व गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी मतदान केंद्राच्या आतील प्रवेश,मतदान अधिकारी क्रमांक एक , दोन , तीन व त्यांची कार्य तसेच वोटिंग कंपार्टमेंट, व्हीव्हीपॅट मशीन व निर्गमन प्रवेशद्वार आदी मतदानाच्या क्रमिक प्रक्रिया लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना जणू मतदान केंद्रातच आपण उभे आहोत की काय या पद्धतीने पाहता येणार आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मतदारांना मतदानाची प्रक्रिया सहज सोपी सुलभ होऊन मतदान टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद व प्रशिक्षण कार्यशाळेत संतोष अजमेरा -संचालक (स्वीप-भारत निवडणूक आयोग),आराधना शर्मा -वरिष्ठ सल्लागार -स्वीप,एस.चोक्कलिंगम (मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र ),किरण कुलकर्णी -अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,शरद दळवी -उप मुख्य निवडणूक अधिकारी व राज्यभरातील स्वीप नोडल अधिकारी यांच्यासमोर तसेच अहमदनगरमध्ये शक्ती सिंग, ममता सिंग, (निवडणूक निरीक्षक -खर्च) , अजय कुमार बिष्ट (निवडणूक निरीक्षक -सामान्य) ,एम. व्ही.जया गौरी (निवडणूक निरीक्षक -पोलीस) ,बाळासाहेब कोळेकर (अपर जिल्हाधिकारी ), राकेश ओला ( जिल्हा पोलीस अधीक्षक ),आशिष येरेकर( मुख्य कार्यकारी अधिकारी – जि. प.) यांच्या स्वीप आढावा बैठकीत अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी)यांनी “व्ही आर बॉक्स मधून मतदान केंद्राचे दर्शन ” हे प्रात्यक्षिक सादर केले. भारतातील सर्वात मोठ्या स्वीपमंडपम कक्षामध्ये जिल्ह्यातील निवडक स्विफ्ट कक्षांमध्ये देखील हे उपकरण नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज ठाकरे प्रचारात, शिलेदार शिवसेनेत

Next Post

ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
vijaya karanjakar

ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011