मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनसे प्रमुख राज ठाकरे कोकणात महायुतीसाठी सभा घेत असताना त्यांचा एक शिलेदार मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाला आहे. ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले आहे.
राज ठाकरे यांनी महायुतीला गुढीपाडव्याच्या सभेत बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला राम-राम केला होता. यानंतर शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
एकीकडे महायुतीला पाठिंबा दिलेले राज ठाकरे यांच्यासह मनसे महायुतीचा प्रचार करत आहे. त्यात शनिवारी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत सभा घेतली आणि त्याचवेळी शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.